बुलडाणा आगाराची बस अपघातानंतर पेटली!; जळून खाक, सुदैवाने प्रवासी बचावले, पण ८ जखमी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा आगाराच्या बुलडाणा -नागपूर बसला आज, ६ ऑक्टोबरला दुपारी एकच्या सुमारास ट्रकने धडक दिली. यात बस आणि ट्रकलाही आग लागली आणि दोन्ही वाहने खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र ८ प्रवासी जखमी झाले. ही घटना खामगाव -अकोला रोडवरील पारस फाट्याजवळ (जि. अकोला) घडली. बुलडाणा आगाराची बस (क्र. एमएच ४० …
 
बुलडाणा आगाराची बस अपघातानंतर पेटली!; जळून खाक, सुदैवाने प्रवासी बचावले, पण ८ जखमी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा आगाराच्या बुलडाणा -नागपूर बसला आज, ६ ऑक्‍टोबरला दुपारी एकच्‍या सुमारास ट्रकने धडक दिली. यात बस आणि ट्रकलाही आग लागली आणि दोन्‍ही वाहने खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र ८ प्रवासी जखमी झाले. ही घटना खामगाव -अकोला रोडवरील पारस फाट्याजवळ (जि. अकोला) घडली.

बुलडाणा आगाराची बस (क्र. एमएच ४० एक्यू ६१६०) सकाळी ११ वाजता बुलडाणा आगारातून नागपूरसाठी निघाली. चालक एन टी लहाने व वाहक जे बी साळवे बस घेऊन जात होते.दुपारी १ वाजेच्या सुमरास पारस फाट्याजवळ कोळसा घेऊन जाणारा ट्रक आणि बसची धडक झाली. या अपघातात ८ जण जखमी झाले. जखमींना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. प्रसंगावधान राखून वेळेत सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर काही क्षणांत बस आणि ट्रकने पेट घेतला. बाळापूर पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस आणि ट्रकचा कोळसा झाला होता.