बुलडाणा कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लावल्या काळ्या फिती

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, 18 जूनला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यास गेलेल्या कोविड कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्हा कोविड आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे आज, 19 जूनला कोविड रुग्णालयात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काल, 18 जूनला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यास गेलेल्या कोविड कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या घटनेवर राज्‍यभरातून संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या. घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्हा कोविड आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे आज, 19 जूनला कोविड रुग्णालयात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोलकुमार गवई, प्रशांत ठेंग, डॉ. ऋषिकेश देशमुख, पुष्कर शिंदे, पवन एकडे, शेख इमरान, संदीप भालेराव, दयानंद गवई, निखिल चाफेकर, डॉ. अक्षय आखरे, डॉ. स्‍नेहा मोरे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.