बुलडाणा, चिखलीत कोरोनाची स्‍थिती दिवसेंदिवस बिकटच!; दोन्‍ही तालुक्‍यांत शंभरी तर जिल्ह्यात आजचा आकडा अर्धहजारी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा आणि चिखली तालुक्यात काहीकेल्या कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. आज, 8 मार्चला कोरोनाने या दोन तालुक्यांतच दोन शतकी आकडा आठला तर जिल्हाभरात 517 रुग्ण आढळले आहेत. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढली असून, उपाययोजना करताना नागरिकांची साथ मिळत नसल्याने त्यांच्यापुढेही पेच निर्माण झाला आहे. चिखली तालुक्याने बाधितांचा उच्चांक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा आणि चिखली तालुक्‍यात काहीकेल्या कोरोना आटोक्‍यात येत नसल्याचे चित्र आहे. आज, 8 मार्चला कोरोनाने या दोन तालुक्‍यांतच दोन शतकी आकडा आठला तर जिल्हाभरात 517 रुग्‍ण आढळले आहेत. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढली असून, उपाययोजना करताना नागरिकांची साथ मिळत नसल्‍याने त्‍यांच्‍यापुढेही पेच निर्माण झाला आहे.

चिखली तालुक्‍याने बाधितांचा उच्चांक गाठला. 135 रुग्‍ण आढळले आहेत. बुलडाणा तालुक्‍यात 109 रुग्‍ण, मलकापूर 66, लोणार 57, शेगाव 27, मेहकर 20, सिंदखेड राजा 18, देऊळगाव राजा 11, जळगाव जामोद 11, मोताळा 2, सिद्धीविनायक हॉस्पिटल अशी रुग्‍णसंख्या आहे. नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्‍यात एकही रुग्‍ण न आढळणे ही या गंभीर संकटातही दिलादायीच बाब म्‍हणावी.