बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांची कामे लागणार मार्गी; प्रलंबित कामांसाठी होणार निधी उपलब्‍ध

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील जिल्हा क्रीडा संकुल आणि जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तशी माहिती दिली. पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या विविध प्रलंबित कामांसंदर्भात मंत्रालयातील क्रीडा मंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री.केदार बोलत होते. …
 
बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांची कामे लागणार मार्गी; प्रलंबित कामांसाठी होणार निधी उपलब्‍ध

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील जिल्हा क्रीडा संकुल आणि जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांच्‍या प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्‍ध होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तशी माहिती दिली. पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या विविध प्रलंबित कामांसंदर्भात मंत्रालयातील क्रीडा मंत्र्यांच्‍या दालनात बैठक घेण्यात आली, त्‍यावेळी श्री.केदार बोलत होते.

श्री. केदार म्हणाले, की सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील तालुका क्रीडा संकुलांचे अद्ययावतीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला असून, सिंदखेड राजा येथे प्रथम वर्षाकरिता कबड्डी, खो खो आणि प्रसाधन गृहासहित तसेच देऊळगाव राजा येथे बहुउद्देशीय हॉल याकामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मानधनावरील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन वितरीत करण्यात येणार आहे. तसेच मानधनावरील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यासंदर्भात लवकरच मंजुरी कार्यवाही करण्यात येईल. डॉ. शिंगणे यांनी नमूद केलेली बुलडाणा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांशी संबंधित प्रलंबित कामे करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून, ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करून घ्यावी, असे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी निर्देश दिले.