बुलडाणा जिल्ह्यातील BSNLची सेवा ठप्प!; केबल तुटल्‍याचा परिणाम

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जळगाव- औरंगाबाद दरम्यान बीएसएनएलची मीडिया केबल खंडित झाली असून, त्याचा फटका बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागाला बसला आहे. या भागात बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे. दुपारी बारानंतर जळगाव -पारोळा, पारोळा- धुळे व धुळे -औरंगाबाद दरम्यानच्या बीएसएनएल मुख्य केबलची मीडिया केबल खंडित झाली. त्यामुळे जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील बीएसएनएल मोबाईल सेवा व इंटरनेट …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जळगाव- औरंगाबाद दरम्यान बीएसएनएलची मीडिया केबल खंडित झाली असून, त्‍याचा फटका बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागाला बसला आहे. या भागात बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे.

दुपारी बारानंतर जळगाव -पारोळा, पारोळा- धुळे व धुळे -औरंगाबाद दरम्यानच्या बीएसएनएल मुख्य केबलची मीडिया केबल खंडित झाली. त्‍यामुळे जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील बीएसएनएल मोबाईल सेवा व इंटरनेट सेवा रात्री 8 पर्यंतही सुरळीत झाली नव्हती. यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता होऊ शकला नाही. दरम्यान,  बुलडाणा लाइव्‍हने जळगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला असता केबलच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र सेवा सुरळीत कधी होईल, हे त्‍यांनी सांगण्यास असमर्थता व्‍यक्‍त केली. अचानक बीएसएनएलची सेवा खंडित झाल्यामुळे मोबाइल धारकांची मोठी गैरसोय होत आहे.