बुलडाणा तहसील हादरले! 3 कोरोना पॉझिटिव्ह, दोघांमध्ये आढळली लक्षणे, इतर कर्मचाऱ्यांची तात्काळ चाचणी

बुलडाणा (संजय मोहिते) ः कोरोनानाने बुलडाणा तहसील कार्यालयात पुन्हा एन्ट्री केली असून, आज, 4 मार्चला तिघे कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे तर दोघांमध्ये कोरोना ची लक्षणे आढळून आली. यामुळे तहसील कार्यालय सध्या बंद ठेवण्यात आले आहे.मागील वर्षी तहसीलमधील काही कर्मचारी बाधित झाले होते. यापाठोपाठ चालू वर्षात मार्चच्या प्रारंभीच कोरोनाने पुन्हा तहसीलवर आक्रमण केले आहे. कार्यालयातील 3 जण …
 

बुलडाणा (संजय मोहिते) ः कोरोनानाने बुलडाणा तहसील कार्यालयात पुन्हा एन्ट्री केली असून, आज, 4 मार्चला तिघे कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे तर दोघांमध्ये कोरोना ची लक्षणे आढळून आली. यामुळे तहसील कार्यालय सध्या बंद ठेवण्यात आले आहे.
मागील वर्षी तहसीलमधील काही कर्मचारी बाधित झाले होते. यापाठोपाठ चालू वर्षात मार्चच्या प्रारंभीच कोरोनाने पुन्हा तहसीलवर आक्रमण केले आहे. कार्यालयातील 3 जण कोरोना बाधित असून तिघांमध्ये लक्षणे आढळून आलीत. त्यांचा अहवाल संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता तहसीलदार रुपेश खंडारे यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना व्‍यक्‍त केली. दक्षतेचा उपाय म्हणून सध्या तहसील कार्यालय बंद ठेवण्यात आले. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यालयातच कोरोना चाचणी करवून घेण्यात आली. त्यांच्या अहवालाची आता भितीयुक्त प्रतीक्षा करण्यात येत आहे, याची खबर आगीसारखी पसरताच कार्यालय परिसर सुनसान झाले आहे.