बुलडाणा तापायला लागलं! आज पारा 41 डिग्रीवर

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कधीकाळी थंड हवेचे ठिकाण वा सेमी हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या बुलडाणा शहराची ही ओळख आता इतिहासजमा होण्याचा मार्गावर आहे! यंदा याचा पुन्हा अनुभव आला असून, आज, 26 एप्रिलला शहरातील तापमापकाचा पारा 41 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला! यामुळे अगोदरच कोरोनामुळे हैराण झालेले हजारो बुलडाणेकर परेशान झाल्याचे दिसून आलेत. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कधीकाळी थंड हवेचे ठिकाण वा सेमी हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या बुलडाणा शहराची ही ओळख आता इतिहासजमा होण्याचा मार्गावर आहे! यंदा याचा पुन्हा अनुभव आला असून, आज, 26 एप्रिलला शहरातील तापमापकाचा पारा 41 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला! यामुळे अगोदरच कोरोनामुळे हैराण झालेले हजारो बुलडाणेकर परेशान झाल्याचे दिसून आलेत.

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्हा मुख्यालयाच्या तापमानात घट झाली होती. 22 एप्रिलला तर तापमान 36.4 पर्यंत घसरले होते. यानंतर त्यात क्रमशः वाढ होत गेली. 23 एप्रिलला 38, नंतर 24 एप्रिलला 39.6, 25 एप्रिलला 40.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 26 एप्रिलला तापमापकाचा पारा थेट 41 डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला! यामुळे आज बुलडाणेकर त्रस्त झाले.

यापूर्वी 31 मार्चलाच यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक राहणार याची चुणूक दिसून आली होती. त्यादिवशी देखील 41 डिग्रीची नोंद झाली होती. यानंतर आज पुन्हा पारा या त्रासदायक आकड्यापर्यंत पोहोचल्याने नजीकच्या काळात तापमान अनेक विक्रम करतानाच सौम्य वातावरणाला सरावलेल्या बुलडाणेकरांची  हॉट फिरकी घेणार असे चित्र आहे.