बुलडाणा तालुक्यातही विकृतांच्या उचापती; अडीच एकरातील सोयाबीन सुडीला लावली आग

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीनच्या सुड्यांना आग लावण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. डोमरूळ (ता. बुलडाणा) येथील शेतकऱ्याच्या अडीच एकर शेतातील सोयाबीनच्या सुडीला कुणीतरी विकृताने आग लावली. त्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. डोमरूळ येथील शेतकरी हरिभाऊ मारोती धंदर यांनी त्यांच्या डोमरूळ शिवारातील गट नं. ४० मध्ये अडीच एकरात सोयाबीन पेरले होते. त्यातून त्यांना …
 
बुलडाणा तालुक्यातही विकृतांच्या उचापती; अडीच एकरातील सोयाबीन सुडीला लावली आग

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीनच्या सुड्यांना आग लावण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. डोमरूळ (ता. बुलडाणा) येथील शेतकऱ्याच्‍या अडीच एकर शेतातील सोयाबीनच्या सुडीला कुणीतरी विकृताने आग लावली. त्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

डोमरूळ येथील शेतकरी हरिभाऊ मारोती धंदर यांनी त्यांच्या डोमरूळ शिवारातील गट नं. ४० मध्ये अडीच एकरात सोयाबीन पेरले होते. त्यातून त्यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्‍न अपेक्षित होते. मात्र १६ ऑक्टोबरच्या रात्री शेतातील सोयाबीनची सुडी जाळून टाकली. काल, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना सोयाबीन पूर्ण जळालेली दिसली. घटनेची माहिती मिळताच तलाठी श्री. कानडजे, कृषी सहाय्यक कविता जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. धाड पोलिसांनी विकृताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.