बुलडाणा तालुक्यात सव्वाशे हेक्टरवरील पिकांना तडाखा; आज संध्याकाळी तहसीलमध्ये बैठक

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल 19 मार्चला झालेल्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा तालुक्यातील सुमारे 120 हेक्टर आर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या संदर्भात तहसील कार्यालयात आज, 20 मार्चला सायंकाळी तातडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काल शुक्रवारी संध्याकाळी व रात्री बुलडाणा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी वाऱ्यासह अवकाळी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काल 19 मार्चला झालेल्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा तालुक्यातील सुमारे 120 हेक्टर आर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या संदर्भात तहसील कार्यालयात आज, 20 मार्चला सायंकाळी तातडीची आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

काल शुक्रवारी संध्याकाळी व रात्री बुलडाणा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी वाऱ्यासह अवकाळी  पावसाने हजेरी लावली. बुलडाणा तालुक्यात 8.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे आपत्ती कक्षाच्या सूत्रांनी सांगितले.  इतर  महसूल मंडळांच्या तुलनेत धाड मंडळ क्षेत्रात जास्त नुकसान झाले असून, सुमारे 120 हेक्टवरील गहू, मका, ज्वारी व कांद्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तलाठ्यांनी सादर केल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. लवकरच सविस्तर पाहणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. दरम्यान तहसीलदार रुपेश खंडारे यांनी आज संध्याकाळी मंडळ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये नुकसानीचा आढावा घेऊन सर्वेक्षणचे नियोजन करण्यात येईल.