बुलडाणा तालुक्याने ओलांडला शंभराचा आकडा! खामगाव पाऊणशे; चिखलीत 61, जिल्ह्यात कोरोना बळी पाचशेच्या उंबरठ्यावर!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुसऱ्या लाटेत जास्तच उपद्रवी ठरलेल्या कोरोनाचे बळी यावर्षी झपाट्याने वाढले. बुलडाणा तालुक्याने शतकीय आकडा गाठला असतानाच खामगावमध्ये पाऊणशे जणांचा मृत्यू झाला आहे. चिखली तालुक्यात हा आकडा साठाच्या पल्याड गेलाय! गत् मार्च 2020 पासून ते 10 मे दरम्यानच्या काळात कोरोना बळींची संख्या आता 500 च्या घरात पोहोचलीय! 10 …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुसऱ्या लाटेत जास्तच उपद्रवी ठरलेल्या कोरोनाचे बळी यावर्षी झपाट्याने वाढले. बुलडाणा तालुक्याने शतकीय आकडा गाठला असतानाच खामगावमध्ये पाऊणशे जणांचा मृत्यू झाला आहे. चिखली तालुक्यात हा आकडा साठाच्या पल्याड गेलाय!

गत्‌ मार्च 2020 पासून ते 10 मे दरम्यानच्या काळात कोरोना बळींची संख्या आता 500 च्या घरात पोहोचलीय! 10 मेपर्यंत या मानवतेच्या शत्रूने 481 जणांचे बळी घेतलेत. त्यातील 3 आघाडीवरील तालुक्यांचा लेखाजोखा वरीलप्रमाणे आहे. याखालोखाल मलकापूर 45, मेहकर 34, नांदुरा 30, मोताळा 27, सिंदखेड राजा 21, जळगाव 17, देऊळगाव राजा 16, शेगाव 13, लोणार 11, संग्रामपूर 1 असा क्रम आहे. चालू वर्षात मृत्यूचे हे थैमान वेगाने वाढले.

वृद्ध व गंभीर आजार असणाऱ्यांना जास्त धोका!

या 481 बळींचे विश्लेषण प्रशासकीय पातळीवर करण्यात आले आहे. एकूण बळीतील तब्बल 260 जणांना हार्ट, बीपी, शुगर सारखे अन्य गंभीर आजार होते. मयतपैकी 152 जण 61 ते 70 वयोगटातील तर 71 व त्यापेक्षा जास्त वयाच्या 152 जण दगावल्याचे चित्र आहे. म्हणजेच 254 रुग्ण साठी ओलांडलेले होते हे स्पष्ट होते. 51 ते 60 या एज ग्रुपमधील 97 तर 41 ते 59 गटातील 56 रुग्ण दगावले. त्यातुलनेत 40 पर्यंत 24 जण मृत्युमुखी पडले.

 सक्षम महिला अन मरणाशी झुंज…

दरम्यान 481 बळींपैकी 62 जण एका दिवसांतच किंबहुना काही तासांतच दगावले! 51 रुग्णांनी 3 दिवस, 96 जणांनी 4 दिवस, 48 व्यक्तींनी 5 दिवस काळाशी दोन हात केलेत. 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मरणाशी संघर्ष करणाऱ्यांची संख्या तब्बल 125 इतकी आहे. दुसरीकडे 481 मध्ये 317 पुरुष तर 164 महिलांचा समावेश आहे. यामुळे महिलांची ईमुनिटी जास्त असते का, असा सवाल उपस्थित झालाय.