बुलडाणा तालुक्‍यातील 25 गावांसाठी 40 विंधन विहिरींना मंजुरी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाणीटंचाई निवारणार्थ बुलडाणा तालुक्यातील 25 गावांत उपाययोजनांचा भाग म्हणून विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांत ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे. विंधन विहिरी मंजूर करण्यात आलेली सर्व गावे बुलडाणा तालुक्यातील आहे. गावे व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाणीटंचाई निवारणार्थ बुलडाणा तालुक्यातील 25 गावांत  उपाययोजनांचा भाग म्हणून विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांत ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

विंधन विहिरी मंजूर करण्यात आलेली सर्व गावे बुलडाणा तालुक्यातील आहे. गावे व मंजूर विंधन विहिरी अशा : मौंढाळा 1 विंधन विहीर, साखळी बुद्रूक 2 विंधन विहीर, भादोला 2 विंधन विहीर, देऊळघाट 3 विंधन विहीर, माळविहीर 1 विंधन विहीर, सव 2, तांदुळवाडी 1, उमाळा 1, येळगाव 1, सुंदरखेड 3, इरला 1, भडगाव 1, ढासाळवाडी 1, पिंपळगाव सराई 2, सैलानी 2, गुम्मी 2, धाड 2, दुधा 1, चिखला 1, रायपूर 2, अंभोडा 1, घाटनांद्रा 1, पाडळी 2,डोंगरखंडाळा 3 व मासरूळ गावासाठी 1 विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण 40 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाईतून ग्रामस्‍थांना दिलासा मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.