बुलडाणा तालुक्‍यात रोज दीड हजार व्यक्तींचे लसीकरण, एप्रिल अखेर 44 हजार जणांना लस देण्याचे टार्गेट!

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ‘लसीकरण वाढवा, कोरोना थांबवा ‘ असे आदेशवजा निर्देश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. याची दखल घेत तहसीलदार रुपेश खंडारे यांनी बुलडाणा तालुक्यातील लसीकरणाचे सुसज्ज कालबद्ध नियोजन केले आहे. शनिवारी ( दि. 20) जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संबंधित यंत्रणांच्या आढावा बैठकीत कोरोनाचा प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ‘लसीकरण  वाढवा, कोरोना थांबवा ‘ असे आदेशवजा निर्देश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. याची दखल घेत तहसीलदार रुपेश खंडारे यांनी बुलडाणा तालुक्यातील लसीकरणाचे सुसज्ज कालबद्ध नियोजन केले आहे.

शनिवारी ( दि. 20) जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संबंधित यंत्रणांच्या आढावा बैठकीत कोरोनाचा प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश दिले. 13 तहसीलदारांनी आरोग्य यंत्रणांच्या सहकार्याने लसीकरण विस्ताराचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना तहसीलदार खंडारे म्हणाले की, बैठकीत ठरल्याप्रमाणे तहसीलमध्ये संयुक्त बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. त्यानुसार  उद्या, 22 मार्चपासून रोज 1500 व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुक्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्र व बुलडाण्यातील नागरी आरोग्य केंद्र येथे हे लसीकरण करण्यात येईल. यासाठी प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. बुलडाणा शहर व तालुक्यात मिळून 44 हजार व्यक्तींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेले व 60 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. आजवर यापैकी 4 हजार नागरिकांना कोविशिल्डची लस देण्यात आली आहे. उर्वरित व्यक्तींना येत्या 25 दिवसांत साधारणतः 20 एप्रिलपर्यंत लस देण्याचे टार्गेट आखून देण्यात आले आहे. या लसीकरणाचा रोज नियमित आढावा घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार खंडारे म्हणाले.