बुलडाणा- धाड रोडवरील जंगलात आग;शेकडो हेक्टर वनसंपदा जुळून खाक; अजूनही धग कायम!

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. बुलडाणा- धाड रोडवरील जंगलात आज, 3 मार्चच्या दुपारपासून भीषण आग लागली. ढालसावंगी येथील आंब्याच्या खोऱ्यात ही आग लागली असून, यात शेकडो हेक्टर वनसंपदेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र आग संध्याकाळी साडेसातपर्यंतही आटोक्यात …
 

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. बुलडाणा- धाड रोडवरील जंगलात आज, 3 मार्चच्‍या दुपारपासून भीषण आग लागली. ढालसावंगी येथील आंब्याच्या खोऱ्यात ही आग लागली असून, यात शेकडो हेक्टर वनसंपदेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र आग संध्याकाळी साडेसातपर्यंतही आटोक्यात आली नव्हती. वनविभागाचे कर्मचारी सध्या घटनास्थळी पोहोचले असून, आग विझवण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. आग कशाने लागली हे मात्र कळू शकले नाही. गेल्या काही दिवसांत जंगलाला आग लागण्याचे प्रमाण वाढले असून, आग लागते की लावली जाते हे समोर येण्याची आवश्यकता आहे.