बुलडाणा नगरपालिकेचे नवे “सीओ’ रूजू!; गणेश पांडे आहेत जिल्ह्याचे भूमिपूत्र!, म्‍हणाले, पारदर्शक लोकाभिमुख कारभारावर भर देणार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मूळचे जिल्ह्याचे भूमिपूत्र व विविध ठिकाणी आपल्या कामगिरीचा ठसा उमविणारे अधिकारी गणेश रामचंद्र पांडे यांनी आज, १२ ऑगस्टला बुलडाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची औपचारिक व एकतर्फी सूत्रे सांभाळली. यानंतर सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करून त्यांनी अप्रत्यक्षपणे गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यय आणून दिला. बुलडाणा पालिकेचे मावळते मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची …
 
बुलडाणा नगरपालिकेचे नवे “सीओ’ रूजू!; गणेश पांडे आहेत जिल्ह्याचे भूमिपूत्र!, म्‍हणाले, पारदर्शक लोकाभिमुख कारभारावर भर देणार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मूळचे जिल्ह्याचे भूमिपूत्र व विविध ठिकाणी आपल्या कामगिरीचा ठसा उमविणारे अधिकारी गणेश रामचंद्र पांडे यांनी आज, १२ ऑगस्‍टला बुलडाणा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची औपचारिक व एकतर्फी सूत्रे सांभाळली. यानंतर सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करून त्यांनी अप्रत्यक्षपणे गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यय आणून दिला.

बुलडाणा पालिकेचे मावळते मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची जत (जिल्हा सांगली) नगरपरिषदेत बदली झाली. त्यांच्या जागी रिसोड पालिकेचे “सीओ’ म्हणून कार्यरत गणेश पांडे हे बदलून आले आहेत. नगरविकास मंत्रालयाच्या बदलीतील सक्त निर्देशामुळे श्री. वाघमोडे व श्री. पांडे यांनी आपल्या नवीन पदाची तात्काळ व एकतर्फी सूत्रे हाती घेतली. गणेश पांडे यांनी आज गुरुवारच्या मुहूर्तावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास पदभार स्वीकारला. यावेळी पालिका कर्मचारी संघटना, कर्मचारी, विविध पक्षीय नगरसेवक, नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांशी परिचय करवून घेत चर्चा केली. आपण पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.