बुलडाणा नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य; व्यापाऱ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः पावसाळी दिवसांत नागरिकांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी प्रामुख्याने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची असते. मात्र नगरपालिका कार्यालयामागील व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य पसरल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे व्यापारी संकुल नरकयातना भोगत आहे. नगरसेवकदेखील सक्रिय नाहीत, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. नगरपालिका कार्यालयामागे नगरपालिकेचे व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावरील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः पावसाळी दिवसांत नागरिकांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी प्रामुख्याने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची असते. मात्र नगरपालिका कार्यालयामागील व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य पसरल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पालिकेच्या दुर्लक्षामुळे व्यापारी संकुल नरकयातना भोगत आहे. नगरसेवकदेखील सक्रिय नाहीत, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. नगरपालिका कार्यालयामागे नगरपालिकेचे व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावरील या व्यापारी संकुलालगत भाजी मार्केट आहे. व्यापारी संकुलाच्या डाव्या बाजूला बंद असलेल्या दुकाना समोर प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

नागरिकांनी या परिसराला शौचालय व मुत्रीघराचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील 200 मीटरपर्यंत दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना येथून जात असताना, नाकाला रुमाल लावल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जवळच असलेल्या बाजार ओट्यावर धान्य बाजार भरत नाही. त्यामुळे या ओट्यावर प्रचंड घाण साचलेली आहे. पावसामुळे या घाणीत आणखी भर पडली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.