बुलडाणा नगराध्यक्ष पतीची पालिका कर्मचार्‍यासोबत बाचाबाची; माफीनाट्याने वादावर पडदा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याचे नगराध्यक्ष पती मोहम्मद सज्जाद यांची एका पालिका कर्मचार्यासोबत बाचाबाची झाली. पालिका कर्मचार्यांनी गोंधळ घालत पोलीस स्टेशन गाठले. तक्रार दिली, परंतु काही बड्या लोकांच्या मध्यस्थीने माफीनाम्याच्या नाट्याने या वादावर पडदा पडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पोलीस ठाण्यात जमलेले पालिका कर्मचारी. आज दुपारी 12:30 च्या सुमारास एक पालिका कर्मचारी आणि नगराध्यक्ष पती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याचे नगराध्यक्ष पती मोहम्मद सज्जाद यांची एका पालिका कर्मचार्‍यासोबत बाचाबाची झाली. पालिका कर्मचार्‍यांनी गोंधळ घालत पोलीस स्टेशन गाठले. तक्रार दिली, परंतु काही बड्या लोकांच्या मध्यस्थीने माफीनाम्याच्या नाट्याने या वादावर पडदा पडल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

पोलीस ठाण्यात जमलेले पालिका कर्मचारी.

आज दुपारी 12:30 च्या सुमारास एक पालिका कर्मचारी आणि नगराध्यक्ष पती मोहमद सज्जाद यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाल्याचे वृत्त आहे. पालिका कर्मचार्‍यांनी याबद्दल बंड पुकारत थेट पोलीस ठाणे गाठले. या प्रकारचे वृत्त पसरताच काही बड्या लोकांनी मध्यस्थी करत नगराध्यक्ष पती माफी मागतील, असा शब्द दिल्याने तूर्तास पेल्यातील वादळ पेल्यातच शमणार असल्याची चर्चा आहे. वृत्त लिहिपर्यंत वादाचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.