‘बुलडाणा लाइव्ह’चे वृत्त अखेर खरे ठरले… देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांच्यासह दोन भाजप नगरसेवक शिवसेनेत दाखल; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त ‘बुलडाणा लाइव्ह’ने आज दुपारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे देऊळगाव राजा शहरासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेकांनी बुलडाणा लाइव्हकडे वृत्ताच्या सत्यतेबाबत चौकशी केली. अखेर आताच काही वेळापूर्वी रात्री 8 च्या सुमारास नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांच्यासह नगरसेविका मालनबी पठाण …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त ‘बुलडाणा लाइव्ह’ने आज दुपारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे देऊळगाव राजा शहरासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेकांनी बुलडाणा लाइव्‍हकडे वृत्ताच्‍या सत्‍यतेबाबत चौकशी केली. अखेर आताच काही वेळापूर्वी रात्री 8 च्‍या सुमारास नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांच्यासह नगरसेविका मालनबी पठाण व नगरसेविका पल्लवी वाजपे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘बुलडाणा लाइव्ह’च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

पक्षप्रवेश करतेवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार डॉ शशीकांत खेडेकर सुद्धा उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत 4 सदस्य भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यातील एकाने यापूर्वीच राष्ट्रवादीची वाट धरल्याने भाजपकडे केवळ तीन सदस्य होते. उरलेल्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्यांनीही नगराध्यक्षा सुनिता शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपकडे केवळ एक सदस्य उरला आहे. भाजपच्या गटनेत्या शारदा जायभाये यांनी मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपा सोडणार नसल्याचे सांगितले.

जनतेतून निवडून आल्या, पण पक्षांतर करणाऱ्या राज्यातील पहिल्या नगराध्यक्षा

भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या मात्र पदावर असताना पक्ष बदलणाऱ्या सुनिता शिंदे या राज्‍यातील पहिल्या अशा नगराध्यक्षा ठरल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच नगराध्यक्ष शिंदे यांचे पती डॉ. शिंदे यांना एसीबीने लाच घेताना पकडले होते. शिवाय देऊळगाव राजा नगरपरिषदेत शिवसेना आघाडीसोबत गेल्याने आघाडीचे संख्याबळ वाढले होते. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा नाहीतर तुमच्यावर अविश्वास ठराव आणू, अशा सूचना नगराध्यक्षांना देण्यात आल्याचे कळते. अखेर त्यांनी आज शिवबंधन बांधलेच.