‘बुलडाणा लाइव्ह’च्या वृत्तानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवले, पण त्यातलाही थातूरमातूरपणा आला समोर!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर पांग्रा -दुसरबीड रस्त्यावर ठिकठिकाण खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत असल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्हने प्रसिद्ध करताच खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र खड्डे बुजवतानाही थातूरमातूर पद्धतीने बुजवल्याचे दिसून येत असून, खड्डे लवकरच पुन्हा उघडे पडतील, अशी शक्यता आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर पांग्रा -दुसरबीड रस्त्यावर ठिकठिकाण खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत असल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्हने प्रसिद्ध करताच खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र खड्डे बुजवतानाही थातूरमातूर पद्धतीने बुजवल्याचे दिसून येत असून, खड्डे लवकरच पुन्हा उघडे पडतील, अशी शक्यता आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावर रोजच छोटे मोठे अपघात घडत होते. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर बस अपघात होऊन 14 जणांचा जीव चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला होता. कै. विजय मखमले विद्यालयासमोरील पुलावर मोठा खड्डा पडलेला असल्यामुळे येणार्‍या जाणार्‍या वाहनांना दिसून येत नव्हता. दुसरबीड फाटा ते वर्दडी फाटा रस्ता तर अक्षरशः चाळणी झालेला होता. यासंदर्भात बुलडाणा लाईव्हने वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच मलकापूर पांग्रा ते दुसरबीड रस्त्यावरील पूर्ण खड्डे बुजवण्यात आले. मात्र खड्डे बुजवताना थातूरमातूर काम करण्यात आले आहे. खड्डे बुजवताना डांबर व्यवस्थित टाकले गेलेले नाही व गिट्टी मोठमोठी टाकण्यात आल्याची तक्रार गावकरी करत आहेत. रस्त्यावर खड्ड्याच्या ठिकाणी मोठी गिट्टी पडलेली असून, त्यामुळे पुन्हा अपघात होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.