‘बुलडाणा लाइव्ह’ने वेळीच इशारा दिला होता… दुर्लक्षामुळे दोघांचे जीव जाता जाता वाचले!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पातोंडा पेंडका (ता. खामगाव) रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या झुडूपांमुळे अपघात होण्याची शक्यता बुलडाणा लाइव्हने वर्तवली होती. आज, 15 जानेवारीला दुपारी पावणेदोनच्या सुमारास ती भीती खरी ठरली. मॅक्झिमो वाहन आणि ओमिनी कारमध्ये समोरासमोर अपघात होऊन दोघे जखमी झाले. सुदैवाने वाहनांचा वेग वेळीच कमी झाल्याने दोघांचे जीव वाचले. जितेंद्र …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पातोंडा पेंडका (ता. खामगाव) रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या झुडूपांमुळे अपघात होण्याची शक्यता बुलडाणा लाइव्हने वर्तवली होती. आज, 15 जानेवारीला दुपारी पावणेदोनच्या सुमारास ती भीती खरी ठरली. मॅक्झिमो वाहन आणि ओमिनी कारमध्ये समोरासमोर अपघात होऊन दोघे जखमी झाले. सुदैवाने वाहनांचा वेग वेळीच कमी झाल्याने दोघांचे जीव वाचले.

जितेंद्र मधुकर तायडे (रा. पातोंडा) व संतोष एकनाथ भटकर (रा. सुटाळा) अशी जखमींची नावे आहेत. खामगाव- मेहकर मुख्य रस्त्यापासून 2 कि. मी. अंतरावर पातोंडा पेडका आहे. गावात जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झुडूपे, गवत वाढले आहेत. त्यामुळे वळणावर समोरील वाहन दिसत नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र संबंधितांनी दखल घेतलेली नाही. बुलडाणा लाइव्हनेही याबाबत वृत्त दिले होते. आज दुपारी पातोंडा येथील गजानन मधुकर तायडे (रा. पातोंडा) यांचे मॅक्झिमो वाहन व संतोष एकनाथ भटकर (रा. सुटाळा) यांची ओमोनी कारची समोरासमोर धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. दोन्ही चालकही किरकोळ जखमी झाले आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या बाजूची झाडे कापावीत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.