बुलडाणा लाइव्ह विशेष ः रामाच्या नावावर तो मागायचा भिक्षा;आता अर्धी संपत्ती केली राम मंदिरासाठी अर्पण!; शेगाव येथील अचंबित करणारी घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिसण्यावरून आणि राहणीमानावरून कुणाबद्दल मत व्यक्त करणे अवघड असते. याचाच अनुभव शेगाव येथील रामजन्मभूमी निधी समर्पण समितीच्या कार्यकर्त्यांना आला. शेगाव शहरात अनेक वर्षांपासून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे मनसुखलाल नंदलाल उंदरकार यांनी राम मंदिर उभारणीसाठी स्वतःकडे असलेली अर्धी संपत्ती अर्पण केली आहे.मनसुखलाल मूळचे यवतमाळचे. काही वर्षांपूर्वी यवतमाळ मध्येच ते हॉटेल चालवायचे. …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिसण्यावरून आणि राहणीमानावरून कुणाबद्दल मत व्यक्त करणे अवघड असते. याचाच अनुभव शेगाव येथील रामजन्मभूमी निधी समर्पण समितीच्या कार्यकर्त्यांना आला. शेगाव शहरात अनेक वर्षांपासून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे मनसुखलाल नंदलाल उंदरकार यांनी राम मंदिर उभारणीसाठी स्वतःकडे असलेली अर्धी संपत्ती अर्पण केली आहे.
मनसुखलाल मूळचे यवतमाळचे. काही वर्षांपूर्वी यवतमाळ मध्येच ते हॉटेल चालवायचे. 90 च्या दशकात साध्वी ऋतंभरा यांच्या राममंदिर आंदोलनातील भाषणाने ते प्रभावित झाले. सर्व काही सोडून शेगाव शहरात फकीर बनून जीवन जगू लागले. येणार्‍या जाणार्‍यांना जय श्री राम, राम राम म्हणायचे. त्यामुळे कुणी हातावर 1 रुपया, 2 रुपया टेकवतात. त्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अयोध्येतल्या राममंदिर उभारणीसाठी निधीसंकलन सुरू असल्याचे त्यांना कळल्यावर त्यांनी त्यांच्याकडे भिक्षेतून जमा झालेल्या पैशांतून अर्धा वाटा हा रामजन्मभूमी निधी संकलन समितीच्या कार्यालयात आणून दिला. त्यांची श्रद्धा पाहून कार्यकर्तेही भारावून गेले.