‘बुलडाणा लाइव्‍ह’ची वाटचाल वाखाणण्याजोगी : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया; ‘बुलडाणा लाइव्‍ह’चा वर्धापन दिन सोहळा थाटात, राधेश्याम चांडक, सौ. आरतीताई पालवे यांना सन्‍मान पुरस्‍कार प्रदान, ‘व्हिजन बुलडाणा’चे लोकार्पण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विश्वासार्हता जपल्यामुळेच बुलडाणा लाइव्हची वाचकसंख्या वाढत गेली. वर्षभरातील बुलडाणा लाइव्हची वाटचाल वाखाणण्याजोगी असून, एखादे न्यूज पोर्टल अशा पद्धतीने चालते यावर विश्वास ठेवणेही कठीण जाते, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी काढले. बुलडाणा लाइव्हच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज, 11 जूनला सकाळी ते अध्यक्षस्थानी बोलत होते. चिखली रोडवरील …
 
‘बुलडाणा लाइव्‍ह’ची वाटचाल वाखाणण्याजोगी : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया; ‘बुलडाणा लाइव्‍ह’चा वर्धापन दिन सोहळा थाटात, राधेश्याम चांडक, सौ. आरतीताई पालवे यांना सन्‍मान पुरस्‍कार प्रदान, ‘व्हिजन बुलडाणा’चे लोकार्पण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विश्वासार्हता जपल्यामुळेच बुलडाणा लाइव्हची वाचकसंख्या वाढत गेली. वर्षभरातील बुलडाणा लाइव्‍हची वाटचाल वाखाणण्याजोगी असून, एखादे न्‍यूज पोर्टल अशा पद्धतीने चालते यावर विश्वास ठेवणेही कठीण जाते, असे गौरवोद्‌गार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी काढले. बुलडाणा लाइव्‍हच्‍या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज, 11 जूनला सकाळी ते अध्यक्षस्‍थानी बोलत होते.

चिखली रोडवरील बुलडाणा अर्बन बँकेच्‍या वर स्‍थित बुलडाणा लाइव्‍ह कार्यालयात कोरोनाविषयक नियम पाळून हा सोहळा झाला. व्‍यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्‍थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, सेवासंकल्प प्रतिष्ठानच्‍या (पळसखेड सपकाळ, ता. चिखली) अध्यक्षा सौ. आरतीताई नंदकुमार पालवे, लाइव्‍ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे, संपादक संजय मोहिते यांची उपस्‍थिती होती. यावेळी श्री. चावरिया म्‍हणाले, की बुलडाणा लाइव्‍हची सुरुवात ज्या काळात झाली तो काळ अत्‍यंत कठीण होता. त्‍यावेळी कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे वृत्तपत्रे बंद होती. अशावेळी बुलडाणा लाइव्‍हच नागरिकांसाठी विश्वसनीय माहितीचे स्‍त्रोत बनले होते. परिणामी बुलडाणा लाइव्‍ह झपाट्याने वाढत गेले. बुलडाणा लाइव्‍ह वेगवान आहेच, पण तटस्‍थही आहे. बातम्‍यांत एकांगीपणा नसतो. सत्‍यता आधीपासून जपल्याने विश्वासार्हता वाढली आहे, असे कौतुकही श्री. चावरिया यांनी केले.

‘बुलडाणा लाइव्‍ह’ची वाटचाल वाखाणण्याजोगी : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया; ‘बुलडाणा लाइव्‍ह’चा वर्धापन दिन सोहळा थाटात, राधेश्याम चांडक, सौ. आरतीताई पालवे यांना सन्‍मान पुरस्‍कार प्रदान, ‘व्हिजन बुलडाणा’चे लोकार्पण

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्‍हणाले, की बुलडाणा लाइव्‍हची पत्रकारिता प्रामाणिक आहे. कोणतीही बातमी देताना सर्वबाजूंनी विचार करून बातमी दिली जाते. प्रशासकीय वर्तुळात बुलडाणा लाइव्‍हला येणाऱ्या बातम्‍यांची दखल घेतली जाते, कारण त्‍यामागचा उद्देश प्रामाणिक असतो. जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे हे प्रभावी माध्यम बनले आहे, असे गौरवोद्‌गार त्‍यांनी काढले.
बुलडाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष राधेश्याम चांडक म्‍हणाले, की पूर्वीच्‍या काळी वृत्तपत्रे मोजकी असायची. त्‍यात बातमी येणे खूप मोठी बाब होती. त्‍यातल्‍या त्‍यात फोटो छापून आणायचा आणखी कठीण बाब. मात्र नंतरच्‍या काळात प्रसारमाध्यमांनी तंत्रज्ञानाची धरलेली कास मोठा बदल घडवणारी ठरली. आता तर बुलडाणा लाइव्‍हमधून घडलेली घटना लगेच कळते. बुलडाणा लाइव्‍हला भविष्यात कधीही बुलडाणा अर्बनची गरज भासली तर सोबत घेऊन चालू, असेही ते म्‍हणाले.
सौ. आरतीताई पालवे म्‍हणाल्या, की आम्‍ही ज्‍या ठिकाणी काम करतो, त्‍या गावात वृत्तपत्र येत नाही. अशावेळी बुलडाणा लाइव्‍हच्‍या माध्यमातून जिल्ह्यातील घडामोडी कळण्यास मदत होते. यापुढेही अशीच प्रगती बुलडाणा लाइव्‍हची होत राहो, अशा शुभेच्‍छाही त्‍यांनी दिल्या. देशोन्‍नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, सेवासंकल्प संस्‍थेचे नंदकुमार पालवे, बुलडाणा लाइव्‍हचे अजय राजगुरे, राजेश कोल्हे, प्रवीण तायडे, भागवत राऊत, बाळासाहेब भोसले, अमोल साळवे यांची प्रामुख्याने उपस्‍थिती होती. सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी केले.

बुलडाणा लाइव्‍ह सन्मान प्रदान
बुलडाणा लाइव्‍हतर्फे यंदापासून सन्‍मान पुरस्‍कार देण्याची परंपरा सुरू करण्यात आली असून, पहिल्या पुरस्‍काराचे मानकरी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी आणि सौ. आरतीताई पालवे ठरले. त्‍यांना सन्‍मान पुरस्‍काराचे वितरण पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

‘व्हिजन बुलडाणा’चे प्रकाशन…
बुलडाणा लाइव्‍हने वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘व्हिजन बुलडाणा’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांनी केले. हा विशेषांक जिल्ह्याच्‍या विकासाची ब्‍लू प्रिंट असून, ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. विशेषांकाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले.