‘बुलडाणा लाइव्‍ह’ने जपली सामाजिक जाणीव… लॉकडाऊनमध्ये उपाशी झोपणाऱ्या 70 गरीब-मनोरुग्‍णांना अन्नवाटप!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या 10 महिन्यांच्या कालावधीत बुलडाणा जिल्हावासियांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘बुलडाणा लाइव्ह’ने सामाजिक भान जपत आज, 28 फेब्रुवारीच्या सायंकाळी 70 गरीब, मनोरुग्णांना अन्न पाकिटांचे वाटप केले. वृत्तसंकलनासाठी गेलेले घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते यांचे लक्ष गेले 2 दिवस उपासमारीचा सामना करत असलेल्या या वंचित घटकाकडे गेले आणि बुलडाणा …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवघ्या 10 महिन्‍यांच्‍या कालावधीत बुलडाणा जिल्हावासियांच्‍या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘बुलडाणा लाइव्‍ह’ने सामाजिक भान जपत आज, 28 फेब्रुवारीच्‍या सायंकाळी 70 गरीब, मनोरुग्‍णांना अन्‍न पाकिटांचे वाटप केले. वृत्तसंकलनासाठी गेलेले घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते यांचे लक्ष गेले 2 दिवस उपासमारीचा सामना करत असलेल्या या वंचित घटकाकडे गेले आणि बुलडाणा लाइव्‍हच्‍या देणगी फंडातून तातडीने त्‍यांच्‍या जेवणाची सोय करण्यात आली.

शुक्रवारी दुपारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्‍यामुळे शहर सुनसान झाले. एरव्‍ही कुणाकडे तरी हात पसरून अन्न मागणाऱ्या मंडळींना आता हात तरी कुणापुढे पसरायचे, असा प्रश्न पडला. त्‍यामुळे शुक्रवार, शनिवारची रात्र अनेक गरीब, मनोरुग्‍णांनी उपाशीपोटीच काढली. रविवारी संचारबंदीचे वृत्तसंकलन करत असताना विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते यांचे लक्ष या घटकाकडे गेले. त्‍यांनी तातडीने बुलडाणा लाइव्‍हचे संचालक आणि लाइव्‍ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांना याबाबत माहिती दिली आणि बुलडाणा लाइव्‍हकडून काही करता येईल का, अशी विचारणा केली. श्री. सांगळे यांनी तातडीने बुलडाणा लाइव्‍हच्‍या देणगी फंडातून व्‍यवस्‍था करत त्‍यांना आज कोणताही गरीब उपाशी झोपू देऊ नका, असे सांगितले. तातडीने श्री. ताकोते आणि पत्रकार संजय त्रिवेदी, पत्रकार राजकुमार व्यास, प्रा. भूषण दाभाडे कामाला लागले. अन्नाची 70 पाकिटे तयार करून ( 3 पोळ्या, आलूची चटणीचे पाकिट) वाटपासाठी ही मंडळी निघाली. सायंकाळी 7 पासून रात्री 8 वाजेपर्यंत एमएसईबी चौक, रेल्‍वेस्‍टेशन, अग्रसेन महाराज भवनासमोर, बसस्‍थानक परिसर, श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात गरीब, मनोरुग्‍णांना शोधून त्‍यांच्‍यापर्यंत हे अन्न पोहोचविण्यात आले. विशेष म्‍हणजे या उपक्रमात श्री. ताकोते यांच्‍या लाडक्‍या लेकीने अनन्‍यानेही आपल्या चिमुकल्या हातांनी अन्न वाटप केले.