‘बुलडाणा लाइव्‍ह’ला वृत्त झळकताच दिवे, फॅन बंद!; सरकारी कार्यालयांत दिसले दिलासादायी चित्र

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अधिकारी, कर्मचारी दालनात किंवा कार्यालयात नसतानाही पंखे आणि लाइटही चालूच राहून बुलडाणा शहरातील सरकारी कार्यालयांत विजेचा अपव्यय होत असल्याचे वृत्त काल बुलडाणा लाइव्हने प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेत पंखे आणि लाइट कुणी नसेल तर बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज, 10 मार्चला जवळपास …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अधिकारी, कर्मचारी दालनात किंवा कार्यालयात नसतानाही पंखे आणि लाइटही चालूच राहून बुलडाणा शहरातील सरकारी कार्यालयांत विजेचा अपव्यय होत असल्याचे वृत्त काल बुलडाणा लाइव्‍हने प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेत पंखे आणि लाइट कुणी नसेल तर बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्‍यामुळे आज, 10 मार्चला जवळपास सर्वच सरकारी कायालयांनी विज बचतीची धडा शिकल्याचे बुलडाणा लाइव्‍हच्‍या पाहणीत दिसून आले.

कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात  आल्याने सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती फारशी नसते. मात्र तरीही सायबांच्या रिकाम्या खुर्चीला पंखे हवा घालत असल्याचे चित्र तहसील, जिल्‍हा परिषदसह इतर सरकारी कार्यालयांत दिसून आले होते. जनतेला विजबचतीचा उपदेश करणाऱ्या सरकारी कार्यालयांतच हे चित्र असल्याने बुलडाणा लाइव्‍हने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. विशेष म्‍हणजे यात महावितरणच्‍या बुडाखालीही अंधार दिसला होता. वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने सरकारी यंत्रणा हलली. अधिकाऱ्यांनी असा विजेचा अपव्यय यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे सुनावत कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. परिणामी आजचे चित्र काही वेगळेच होते.