बुलडाणा शहरातील अपघात : स्कूटीला मोटारसायकलने उडवले; 7 वर्षीय बालिका गंभीर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उभ्या स्कूटीला दुचाकीने धडक दिल्याने 7 वर्षीय बालिका गंभीर झाली. ही घटना बुलडाणा शहरातील जिजामाता कॉलेजसमोर काल दुपारी 12 च्या सुमारास घडली. याप्रकरणी आज बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालविणार्या मोटारसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल शिवलाल बिबे (38, रा. एकतानगर बुलडाणा) हे त्यांची मुलगी साची हिला स्कूटीवर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उभ्या स्कूटीला दुचाकीने धडक दिल्याने 7 वर्षीय बालिका गंभीर झाली. ही घटना बुलडाणा शहरातील जिजामाता कॉलेजसमोर काल दुपारी 12 च्या सुमारास घडली. याप्रकरणी आज बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या मोटारसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल शिवलाल बिबे (38, रा. एकतानगर बुलडाणा) हे त्यांची मुलगी साची हिला स्कूटीवर घेऊन बाजारात सामान आणण्यासाठी निघाले होते. दरम्यान जिजामाता कॉलेजसमोर स्कूटी उभी करून ते सामान आणण्यासाठी जात असताना मागून येणार्‍या दुचाकीने (एमएच 28, जी 7850) स्कूटीला जोरदार धडक दिली. यात सात वर्षीय साची गंभीर जखमी झाली.धडक देणार्‍या दुचाकीस्वाराने गाडी गाडी जागेवरच सोडून पळ काढला. आज साचीच्या वडिलांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.