बुलडाणा शहरातील विकासकामांसाठी रिपाइं गवई गटाचे बेमुदत उपोषण सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील विविध विकासकामांच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते काल, १५ सप्टेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधील टिपू सुलतान चौकातील जगदंबा मातेच्या मंदिरापासून अस्लम किराणा- अरुण गवळी यांच्या घरापर्यंत पक्क्या नालीचे बांधकाम व्हावे. नाली घाण पाण्याने भरली असल्याने …
 
बुलडाणा शहरातील विकासकामांसाठी रिपाइं गवई गटाचे बेमुदत उपोषण सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील विविध विकासकामांच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते काल, १५ सप्टेंबरपासून उपोषणाला बसले आहेत.

प्रभाग क्रमांक ४ मधील टिपू सुलतान चौकातील जगदंबा मातेच्या मंदिरापासून अस्लम किराणा- अरुण गवळी यांच्या घरापर्यंत पक्क्या नालीचे बांधकाम व्हावे. नाली घाण पाण्याने भरली असल्याने या भागात आजारांचे प्रमाण वाढले आहे. २०१८ पासून नागरिकांची ही मागणी आहे. १५ दिवसांत काम करून देतो असे आश्वासन नागरिकांनी दिले होते. मात्र अजूनही कामाला सुरुवात केली नाही. शहरातील विविध विकासकामे देखील प्रलंबित आहेत. ती सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी राज्य कार्याध्यक्ष जलील खान मोहम्मद खान, जिल्हा उपाध्यक्ष कय्युम खान चांद खान, फिरोज खान नूर खान, अब्दुल हमीद, अब्दुल कादीर यांनी केली आहे.