बुलडाणा शहरातील व्यापारी, व्यावसायिकांसाठी खुशखबर..!; ही बातमी खास त्‍यांच्‍यासाठी…!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील विविध शहरांत येलो पेजेस डिरेक्टरी / डिक्शनरी काढणारी प्रसिद्ध “कव्हरेज गुरू’ संस्था आता बुलडाणा शहरातील व्यापारी, व्यावसायिकांची डिक्शनरी काढणार आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील क्रमांक १ ची न्यूज वेबसाईट “बुलडाणा लाइव्ह’ची मदत घेतली आहे. “बुलडाणा मार्केट डिक्शनरी’ नावाने ही डिक्शनरी लवकरच प्रसिद्ध होणार असून, यात फुल विक्रेत्यापासून तर मोठ्या शोरूमपर्यंतची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्‍यातील विविध शहरांत येलो पेजेस डिरेक्‍टरी / डिक्‍शनरी काढणारी प्रसिद्ध “कव्‍हरेज गुरू’ संस्‍था आता बुलडाणा शहरातील व्यापारी, व्यावसायिकांची डिक्‍शनरी काढणार आहे. यासाठी त्‍यांनी जिल्ह्यातील क्रमांक १ ची न्‍यूज वेबसाईट “बुलडाणा लाइव्‍ह’ची मदत घेतली आहे. “बुलडाणा मार्केट डिक्‍शनरी’ नावाने ही डिक्‍शनरी लवकरच प्रसिद्ध होणार असून, यात फुल विक्रेत्‍यापासून तर मोठ्या शोरूमपर्यंतची माहिती असेल. शिवाय एलआयसी एजंटपासून प्रसिद्ध डॉक्‍टर, वकिलांपर्यंत सर्व सेवादात्‍यांची माहिती समाविष्ट असेल. कुठे कोणते साहित्य मिळते, कोणती सेवा कोण देते याची इत्‍यंभूत माहिती डिक्‍शनरीत असेल त्‍यामुळे ग्राहकांच्‍या खरेदीतील अडचणी दूर होणार आहेत. शिवाय वर्षभर ग्राहकांच्‍या घरात ही डिक्‍शनरी राहणार असल्याने व्‍यापाऱ्यांचाही मोठा लाभ होणार आहे. या डिक्‍शनरीसाठी बुलडाणा लाइव्‍ह मीडिया पार्टनर असून, अजय राजगुरे हे माहिती संकलक म्‍हणून बुलडाणा शहरासाठी नियुक्‍त करण्यात आले आहेत. व्‍यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाची माहिती जास्तीत जास्त संख्येने त्‍यांच्‍याकडे द्यावी. माहिती देण्यासाठी त्‍यांना 9922359674 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कव्‍हरेज गुरू आणि बुलडाणा लाइव्‍हने केले आहे.