बुलडाणा शहरात दुचाकीचोरांनी काढले डोके वर; 2 दुचाकींची चोरी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातून 2 दुचाकींची चोरी झाली आहे. एक दुचाकी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून आणि दुसरी सुंदरखेड भागातील डॉ. संचेती रुग्णालय परिसरातून चोरीस गेली आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की संजय पांडुरंग दाभाडे (रा. शेंबा, ता. मोताळा) हे डॉ. संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता तिथून त्यांची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातून 2 दुचाकींची चोरी झाली आहे. एक दुचाकी जिल्हा सामान्य रुग्‍णालय परिसरातून आणि दुसरी सुंदरखेड भागातील डॉ. संचेती रुग्‍णालय परिसरातून चोरीस गेली आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले, की संजय पांडुरंग दाभाडे (रा. शेंबा, ता. मोताळा) हे डॉ. संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. तेथून जिल्हा सामान्य रुग्‍णालयात गेले असता तिथून त्‍यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच 20 इएम 8878, किंमत 20 हजार रुपये) चोरीस गेली. ही घटना आज, 3 मे रोजी पावणे तीन ते साडेतीनच्‍या सुमारास घडली.

दुसरी दुचाकी (क्रमांक एमएच 21 एझेड 5838) डॉ. संचेती हॉस्पिटलजवळून 28 एप्रिलला चोरीस गेली. पवन काकडे (26, रा. शिरपूर, ता. चिखली) हा नातेवाइकाला भेटण्यासाठी संचेती हॉस्पिटलमध्ये मित्र विशाल काकडेसोबत आला होता. नातेवाईक राजेश आडवे यांच्‍या मालकीची दुचाकी चोरीस गेली. दोन्‍ही घटनांचा तपास एएसआय नामदेवराव खवले, एनपीसी बळीराम खंडागळे करत आहेत.