बुलडाणा शहरात वाढतोय कोरोनाचा धोका😨; पाचच दिवसांत 50 बाधित; शहरवासियांनी सतर्क होण्याची गरज, जिल्ह्यात आज आढळले 53 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या पाच दिवसांत बुलडाणा शहरात 51 कोरोनाबाधित समोर आले असून, त्यामुळे शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट तर होत नाही ना, याबद्दल शहरवासियांनी सतर्क होण्याची गरज आहे. मास्क न लावणे, सॅनिटायझरचा वापर न करणे या हलगर्जीपणामुळे कोरोनाचे फावते आहे. याची वेळीच दखल सर्वांनी घेण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज, 14 जानेवारीला 53 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या पाच दिवसांत बुलडाणा शहरात 51 कोरोनाबाधित समोर आले असून, त्यामुळे शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट तर होत नाही ना, याबद्दल शहरवासियांनी सतर्क होण्याची गरज आहे. मास्क न लावणे, सॅनिटायझरचा वापर न करणे या हलगर्जीपणामुळे कोरोनाचे फावते आहे. याची वेळीच दखल सर्वांनी घेण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज, 14 जानेवारीला 53 नवे रुग्ण आढळले असून, यात 10 एकट्या बुलडाणा शहरातील आहेत, तर खामगाव शहरात सर्वाधिक 14 रुग्ण आढळले आहेत.

बुलडाणा शहरात काल 17 रुग्ण, मंगळवारी 10, सोमवारी 9 आणि रविवारी 5 रुग्ण आढळले होते. दरम्यान, आज प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 478 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 425 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 45 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 324 तर रॅपिड टेस्टमधील 101 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

मलकापूर शहर : 9, बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : पाडळी 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : चंदनपूर 2, अंत्री खेडेकर 1, मोताळा शहर : 1, खामगाव शहर : 14, खामगाव तालुका : पाटोदा 1, शेगाव शहर : 1, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : गिरोली 1, नसिराबाद 1, देऊळगाव राजा शहर : 5, देऊळगाव राजा तालुका ः देऊळगाव मही 1

55 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 55 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः जळगाव जामोद : 2, चिखली : 2, लोणार : 1, सिंदखेड राजा : 3, संग्रामपूर : 3, खामगाव : 19, देऊळगाव राजा : 12, शेगाव : 12, मलकापूर : 1

318 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 95440 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12694 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 840 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 95440 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 13169 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 318 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 157 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.