बुलडाणा शहरावरील संकट गडद! 8 दिवसांत पॉझिटिव्ह अडीचशेच्या घरात; परिसरातील खेडेगावातही वाढला उद्रेक, कंटेन्मेंटमध्ये टॉपर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अगदी कोरोना नवीन असतानाही थोडक्यात निभावलेल्या व आजपासून पूर्णत प्रतिबंधित झालेल्या बुलडाणा शहरावरील कोरोनाचे संकट गडद झाल्याचे गंभीर चित्र आहे. गत् 8 दिवसांतच शहरातील रुग्णांनी विक्रमी 240 चा धक्कादायक आकडा गाठलाय! दिवसाला 30 पॉझिटिव्ह या सरासरीने हा आकडा वाढतोय. यामुळे कंटेन्मेंटच्या दुर्दैवी टॉप फाईव्हमध्ये जिल्हा मुख्यालयाचे हे …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अगदी कोरोना नवीन असतानाही थोडक्यात निभावलेल्या व आजपासून पूर्णत प्रतिबंधित झालेल्या बुलडाणा शहरावरील कोरोनाचे संकट गडद झाल्याचे गंभीर चित्र आहे. गत्‌ 8 दिवसांतच शहरातील रुग्णांनी विक्रमी 240 चा धक्कादायक आकडा गाठलाय! दिवसाला 30 पॉझिटिव्ह या सरासरीने हा आकडा वाढतोय. यामुळे कंटेन्मेंटच्या दुर्दैवी टॉप फाईव्हमध्ये जिल्हा मुख्यालयाचे हे शहर टॉपर ठरले आहे.
गत्‌ 5 दिवसांपासून जिल्ह्याची आकडेवारी 215 ते 350 च्या दरम्यान रेंगाळत आहे. यात बुलडाण्याचा वाटा मोठा ठरत आहे. 15 फेब्रुवारी पासून शहरातील रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. 15 तारखेला 24 पॉझिटिव्ह, 16 तारखेला 37, 17 तारखेला 22, 18 तारखेला 30, 19 तारखेला 27 तर 20 फेब्रुवारीला 29 रुग्णांचा आकडा होता. यानंतर मात्र पॉझिटिव्हच्‍या आकड्याने अर्धशतक गाठले! 21 फेब्रुवारी ला 56 तर आज 22 ला 51 रुग्ण आढळून आले. हा आकडा चक्रावून टाकणारा व आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासनाची चिंता वाढणारी बाब ठरली आहे.

ग्रामीण भागातही वाढ
दरम्यान मुख्यालयाच्या या वाढीबरोबरच बुलडाणा तालुक्यातही कोरोनाचा उद्रेक वाढत चाललाय! याच काळात ग्रामीणची संख्या 28 बाधितांपर्यंत गेली आहे. यामध्ये बुलडाण्याचे उपनगर असलेले सुंदरखेड, सागवान, येळगाव तसेच कोलवड, गिरडा, अजीसपूर, गिरडा, दहिद, नांद्रा कोळी, चांडोळपर्यंत कोरोनाचा विस्तार झाला आहे. आज 22 फेब्रुवारीला ग्रामीण चा आकडा 15 वर पोहोचला, ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.