बुलडाणेकरांची तहान भागवणाऱ्या येळगाव जलाशयात उरला फक्त 26 टक्के जलसाठा; गेल्यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच 100 टक्के भरले होते!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सध्या 26 टक्के इतका जलसाठा आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आजच्या तारखेत येळगाव धरण पूर्णपणे भरले होते. परिसरातील पेरण्यासुद्धा 100 टक्के आटोपल्या होत्या. यावर्षी आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाल्याने साठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. येळगाव परिसरातील 80 ते 90 टक्के पेरण्याही अजूनही झाल्या नाहीत. मागील वर्षी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात सध्या 26 टक्के इतका जलसाठा आहे. विशेष म्हणजे गेल्‍यावर्षी आजच्या तारखेत येळगाव धरण पूर्णपणे भरले होते. परिसरातील पेरण्यासुद्धा 100 टक्के आटोपल्या होत्या. यावर्षी आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाल्याने साठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. येळगाव परिसरातील 80 ते 90 टक्के पेरण्याही अजूनही झाल्या नाहीत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी अजूनही धरणात 3 महिने पुरेल इतके पाणी शिल्लक आहे.