बुलडाणेकरांच्या सेवेत हापूस आंबा; बुलडाणा अर्बनने करून दिली सोय!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या संकट काळातही बुलडाणा शहरातील नागरिकांना हापूस अंब्याची चव चाखता यावी या उद्देशाने बुलडाणा अर्बनतर्फे 3 हजार पेट्या हापूस शहरात मागविण्यात आला आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नाममात्र शुल्कात हापूस आंबा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज, 3 मे रोजी बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झवर यांच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या संकट काळातही बुलडाणा शहरातील नागरिकांना हापूस अंब्याची चव चाखता यावी या उद्देशाने बुलडाणा अर्बनतर्फे 3 हजार पेट्या हापूस शहरात मागविण्यात आला आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नाममात्र शुल्कात हापूस आंबा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आज, 3 मे रोजी बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झवर यांच्या हस्ते हापूस आंबा स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. बुलडाणा प्राइड बिल्डिंगमध्ये आंब्याचा स्टॉल लावण्यात आला असून, कोकणातील रत्‍नागिरीहून हापूस आंबा आणल्याचे सांगण्यात आले. तब्बल 16 वर्षांपासून दरवर्षी हापूस आंबा संस्थेतर्फे बुलडाण्यात आणला जातो.

यावर्षी हापूस आंबा थेट नागरिकांच्या घरी पोहोचविण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असल्याने कोरोनाचा संसर्ग थांबविण्यात मदत होणार आहे. रोख रक्कम न देता ऑनलाइन पेमेंट करण्याची सोय करण्यात आली आहे. या कोरोनाच्या संकट काळात सुद्धा हापूस आंब्‍याची चव नागरिकांना चाखता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आंबा मागविण्यासाठी संजय कस्‍तुरे यांच्‍याशी 9011023532 या मोबाइलवर संपर्क करता येईल.