बुलडाणेकरांनो, उद्यापासून विचारांतीच पडा घराबाहेर! 6 पथकांची राहणार तुमच्यावर करडी नजर!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा वासीयांना सावध व सतर्क करणारी ही बातमी आहे! शहरवासीयांनी उद्या, 21 एप्रिलपासून विचार करूनच घराबाहेर पडलेले बरे! याचे कारण दिवसभर रस्त्यावर अकारण भटकणाऱ्या व उंडरणाऱ्या मोकाटांवर आता दोनेक नव्हे तब्बल 6 संयुक्त पथकांची करडी नजर राहणार आहे. ही पथके अकारण पेट्रोलचा धूर करीत सुसाट वाहने पळविणाऱ्या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा वासीयांना सावध  व सतर्क करणारी  ही बातमी आहे! शहरवासीयांनी उद्या, 21 एप्रिलपासून विचार करूनच घराबाहेर पडलेले बरे! याचे कारण  दिवसभर रस्त्यावर अकारण  भटकणाऱ्या व उंडरणाऱ्या मोकाटांवर आता दोनेक नव्हे तब्बल 6 संयुक्त पथकांची करडी नजर राहणार आहे.

ही पथके अकारण पेट्रोलचा धूर करीत सुसाट वाहने पळविणाऱ्या वाहधारक व पायदळ वारी करणाऱ्यांची नुसतीच कान उघडणी करणार नसून त्यांचा खिसा खाली करणार आहे! अर्थात अशा मोकाटांवर दंडात्मक कारवाई करून त्याच्या हाती पावती टिकविण्याचा धडाका ही पथके लावणार आहेत. तहसीलदार रुपेश खंडारे यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.  यात 2 फिरती तर 4 स्थिर पथकांचा समावेश  राहणार आहे. या पथकात महसूल, पोलीस  विभाग व नगरपालिका मिळून 30 कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार असल्याचे तहसीलदार खंडारे यांनी स्पष्ट केले.