बुलडाणेकरांनो, कोरोना रुग्‍ण वाढताहेत, आज शंभरी पार…; मोताळ्यातील पुरुषाचा मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना गेल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या जिल्हावासियांना धक्का देण्याचा प्रयत्नच जणू कोरोना करत असल्याचे दिसून आले. आज, 14 फेब्रुवारीला कोरोनाने दिवसभरातच शंभरी पार केली असून, तब्बल 101 रुग्ण आढळले आहेत. एक बळीही कोरोनाने घेतला असून, मोताळा येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींचा एकूण आकडा 177 वर गेला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना गेल्याच्‍या आविर्भावात वावरणाऱ्या जिल्‍हावासियांना धक्‍का देण्याचा प्रयत्‍नच जणू कोरोना करत असल्याचे दिसून आले. आज, 14 फेब्रुवारीला कोरोनाने दिवसभरातच शंभरी पार केली असून, तब्‍बल 101 रुग्‍ण आढळले आहेत. एक बळीही कोरोनाने घेतला असून, मोताळा येथील 63 वर्षीय पुरुष रुग्‍णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्‍यामुळे बळींचा एकूण आकडा 177 वर गेला आहे. दिवसभरात 46 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 504 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 387 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 110 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 39 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 261 तर रॅपिड टेस्टमधील 126 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

चिखली शहर : 27, चिखली तालुका : हातणी 2, कोलारा 1, अंत्रिकोळी 1, अमडापूर 3, अंचरवाडी 2, खंडाळा 2, भोकरवडी 1, जांभोरा 1, पाटोदा 1, भालगाव 2, देऊळगाव राजा शहर : 9, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 2, डोढरा 1, गिरोली बुद्रूक 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 3, सिंदखेड राजा शहर : 1, लोणार तालुका : अंजनी खुर्द 1, बुलडाणा तालुका : अजीसपूर 1, बुलडाणा शहर : 24, जळगाव जामोद तालुका : वाडी 1, खामगाव शहर : 10, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : मोरखेड 1, लासुरा 1, मोताळा तालुका : मूर्ती 1, खामगाव तालुका : लाखनवाडा खुर्द 2, सुटाळा 1, हिवरखेड खुर्द 1, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : पिंप्री अढाव 1, मूळ पत्ता धावडा ता. भोकरदन जि. जालना 1, जळगाव 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 91 रुग्‍ण आढळले आहे.

46 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 46 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः खामगाव : 2, चिखली : 5, देऊळगाव राजा : 12, बुलडाणा : अपंग विद्यालय 13, लोणार : 1, शेगाव : 5, नांदुरा : 1, सिंदखेड राजा : 1, मलकापूर : 5, जळगाव जामोद : 1.

523 कोरोना बाधित रुग्‍णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 115021 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14115 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 887 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 14815 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयांत 523 कोरोना बाधित रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 177 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.