बुलडाणेकरांनो जपून वापरा पाणी; येळगाव जलाशयात दोन महिने पुरेल इतकेच पाणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील घाटावरील छोटी धरणेही भरली आहेत. मात्र जिल्ह्यात इतरत्र झालेल्या पावसाच्या तुलनेत बुलडाणा तालुका आणि येळगाव धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे येळगाव धरणात आता अवघा २५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक असून, ते पाणी दोन ते अडीच महिनेच पुरेल. मागील वर्षी …
 
बुलडाणेकरांनो जपून वापरा पाणी; येळगाव जलाशयात दोन महिने पुरेल इतकेच पाणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील घाटावरील छोटी धरणेही भरली आहेत. मात्र जिल्ह्यात इतरत्र झालेल्या पावसाच्या तुलनेत बुलडाणा तालुका आणि येळगाव धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे येळगाव धरणात आता अवघा २५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक असून, ते पाणी दोन ते अडीच महिनेच पुरेल.

मागील वर्षी जूनमध्येच येळगाव धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे वर्षभरात पाणीपुरवठ्यात कुठेच कपात करण्याची गरज भासली नव्हती. मात्र यावर्षी ऑगस्ट उजाडला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाली नाही. येळगाव व बुलडाणा तालुक्यातील पेरण्याही यंदा उशिरा आटोपल्या. घाटावर चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा या भागात आतापर्यंत जोरदार पाऊस झाला आहे. या भागातील छोटी जलाशये तुडुंब भरली आहेत. बुलडाणा तालुक्यात व येळगाव धरणक्षेत्रात येणाऱ्या काळात जर दमदार पाऊस झाला नाही तर बुलडाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.