बुलडाणेकरांनो सावधान… दुचाकीचोरीच्‍या घटना वाढल्या…; चिखलीतूनही मोटारसायकल लांबवली

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून, बुलडाणेकरांनी आपली दुचाकी चोरी जाणार नाही याची काळजी घेणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. कालच बुलडाणा लाइव्हने दोन दुचाकी चोरीची बातमी दिली होती. आज, ९ जुलैला चिखलीतून आणखी एक दुचाकी डॉ. धनवे यांच्या दवाखान्यातून चोरीस गेल्याचे समाेर आले आहे. चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल …
 
बुलडाणेकरांनो सावधान… दुचाकीचोरीच्‍या घटना वाढल्या…; चिखलीतूनही मोटारसायकल लांबवली

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात दुचाकी चोरीच्‍या घटना वाढल्‍या असून, बुलडाणेकरांनी आपली दुचाकी चोरी जाणार नाही याची काळजी घेणे आता अत्‍यंत गरजेचे झाले आहे. कालच बुलडाणा लाइव्‍हने दोन दुचाकी चोरीची बातमी दिली होती. आज, ९ जुलैला चिखलीतून आणखी एक दुचाकी डॉ. धनवे यांच्‍या दवाखान्यातून चोरीस गेल्याचे समाेर आले आहे. चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

राजू डिगांबर खांडेभराड (२२, रा. सिंदखेड राजा) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो ट्रॅक्‍टरचालक आहे. पत्नी सौ. वैशाली आणि मुलाला त्‍याने चिखली येथील डाॅ. धनवे यांच्‍या दवाखान्यात सात दिवसांपूर्वी भरती केले होते. दवाखान्यातून घरी येण्या जाण्यासाठी तो वडिलांच्‍या नावावर असलेली मोटारसायकल वापरत होता. दवाखान्यासमोर ही मोटारसायकल तो लाॅक करून ठेवायचा. ७ जुलैला रात्री ती लॉक करून तो पत्‍नीजवळ थांबला होता. सकाळी साडेसहाला त्‍याने दवाखान्याबाहेर येऊन पाहिले असता मोटारसायकल (क्रमांक MH 28 AY 8821) गायब दिसली. आजूबाजूला शोध घेऊनही मिळाली नाही. मोटारसायकल (किंमत अंदाजे ४० हजार) कुणीतरी चोरून नेल्याचे लक्षात आल्याने त्‍याने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.