बुलडाणेकरांनो सावधान! बुलडाणा शहर होतंय सील!! सर्व मुख्य चौकांत लागताहेत बॅरिकेट्स; कॅमेरांची राहणार करडी नजर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः शहरवासियानो बातमीचे हेडिंग वाचून चक्रावून गेला असाल तर त्यात काहीच गैर नसून, आज रात्री 8 पासून 20 मेपर्यंत बुलडाणा शहर जवळपास सील राहणार आहे. यासाठी शहरातील भर गर्दीचे मुख्य चौक व रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. तहसील चौकापासून याचा शुभारंभ झाला असून, सायंकाळपर्यंत अकारण …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः शहरवासियानो बातमीचे हेडिंग वाचून चक्रावून गेला असाल तर त्यात काहीच गैर नसून, आज रात्री 8 पासून  20 मेपर्यंत बुलडाणा शहर जवळपास सील राहणार आहे. यासाठी शहरातील भर गर्दीचे मुख्य चौक व रस्ते बॅरिकेटस लावून बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. तहसील चौकापासून याचा शुभारंभ झाला असून, सायंकाळपर्यंत अकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना व पादचाऱ्यांनाही भटकंती महागात पडणार आहे.

मागील वर्षी अनुभवलेला कडक लॉकडाऊन, संचारबंदी व यंत्रणा, पोलीसांची रोख ‘ठोक’ कारवाई, याची शहरवासियांना पुन्हा यानिमित्ताने पुन्हा आठवण होणार आहे. यामुळे भटकेगिरी न केलेलीच बरी असा बुलडाणा लाईव्ह आणि पोलीस दादांचा सल्ला आहे. काल घोषित झालेला 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन नेहमीसारखा कागदोपत्री असेल असा अनेकांचा गैरसमज आज दुपारी रणरणत्या उन्हात सुरू झालेल्या या कारवाईने दूर झाला असणार हे नक्की! तहसीलदार रुपेश खंडारे व बुलडाणा पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात शहरात सुमारे 25 ठिकाणी 44 बॅरिकेट्स लावण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथन तहसील चौक बंद करण्यात आला. यानंतर क्रमाक्रमाने रहदारीचे भाग सील करणे सुरू आहे, असे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी बुलडाणा लाईव्हला सांगितले. यासाठी सुमारे 200 बांबू वापरण्यात येत असून पुरेसे कर्मचारी नेमण्यात आल्याचे ते म्हणाले. याशिवाय काही ठिकाणी व्‍हिडिओ कॅमेरे राहणार असून त्यातून भटक्यावर नजर ठेवण्यात येणार आहे, असेही वाघमोडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान या कारवाईवर बुलडाणा शहर पोलीस सुद्धा नजर ठेवून आहेत.