बुलडाण्याचे व्‍यापारी भेटले जिल्‍हाधिकाऱ्यांना!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललेल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले. सर्व दुकाने आणि आस्थापनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंतची मुभा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेखर नागपाल, अजय वानखेडे, राकेश चोपडा, महेश मिहालनी, विनोद राजदे, कुलदीपसिंह पॉपली, जितेंद्र जैन, दिलीप कोठारी, सतीश कोठारी, मुकेश …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कर्जाच्‍या ओझ्याखाली दबत चाललेल्या व्‍यापाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले. सर्व दुकाने आणि आस्‍थापनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंतची मुभा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेखर नागपाल, अजय वानखेडे, राकेश चोपडा, महेश मिहालनी, विनोद राजदे, कुलदीपसिंह पॉपली, जितेंद्र जैन, दिलीप कोठारी, सतीश कोठारी, मुकेश डागा, अक्षय देशलहरा, गौतमचंद भंसाली, राजू नाईकवाडे, अजय भारती हे व्‍यापारी जिल्‍हाधिकारी एस. रामामूर्ती यांना भेटले. ना वीजबिल माफ झाले ना कोणते कर यामुळे व्‍यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. त्‍यांच्‍याकडील कामगारही अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील व्‍यापाऱ्यांच्‍या चाचण्या झाल्या तशा चौकाचौकात शिबिरे घेऊन नागरिकांच्‍याही चाचण्या कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.