बुलडाण्याच्या मोबाइल व्यावसायिकाची राजूर घाटात आत्महत्या

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील मोबाईल व्यावसायिक स्वप्निल अरुण भन्साली (36) यांनी आज, 14 जानेवारीला सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ ही घटना घडली. एका झाडाला मृतदेह लटकलेला आढळला. स्वप्नील भन्साली हे बुलडाणा शहरातील नामांकित मोबाईल व्यावसायिक होते. शहरातील कारंजा चौकात त्यांचे अरिहंत कम्युनिकेशन नावाचे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील मोबाईल व्यावसायिक स्वप्निल अरुण भन्साली (36) यांनी आज, 14 जानेवारीला सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ ही घटना घडली. एका झाडाला मृतदेह लटकलेला आढळला.

स्वप्नील भन्साली हे बुलडाणा शहरातील नामांकित मोबाईल व्यावसायिक होते. शहरातील कारंजा चौकात त्यांचे अरिहंत कम्युनिकेशन नावाचे मोबाईल शॉप आहे. बोराखेडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वृत्त लिहिपर्यंत त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.