बुलडाण्याच्या वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार! कृत्रिम सांधेरोपणाचे ऑपरेशन यशस्वी, दुसर्‍याच दिवशी वजनासह चालला वृद्ध रुग्ण!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः आज मेडिकल सायन्सने मोठा पल्ला गाठला असला तरी अजूनही आव्हानात्मक व गुंतागुंतीची समजली जाणारी कृत्रिम सांधेरोपणाची शस्त्रक्रिया बुलडाणा येथे यशस्वीरीत्या पार पडली. यातही विशेष म्हणजे या वृद्ध रुग्णाला दुसर्याच दिवशी वजन घेऊन चालविण्यात आले.बुलडाणा येथील सिटी हॉस्पिटल ट्रॉमा केअर युनिटमधील तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल जैस्वाल यांनी बुलडाण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील हा चमत्कार घडवला. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः आज मेडिकल सायन्सने मोठा पल्ला गाठला असला तरी अजूनही आव्हानात्मक व गुंतागुंतीची समजली जाणारी कृत्रिम सांधेरोपणाची शस्त्रक्रिया बुलडाणा येथे यशस्वीरीत्या पार पडली. यातही विशेष म्हणजे या वृद्ध रुग्णाला दुसर्‍याच दिवशी वजन घेऊन चालविण्यात आले.
बुलडाणा येथील सिटी हॉस्पिटल ट्रॉमा केअर युनिटमधील तज्ज्ञ  डॉ. प्रफुल्ल जैस्वाल यांनी बुलडाण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील हा चमत्कार घडवला. धाडनजीकच्या एका खेडेगावातील हा रुग्ण अनेक दिवसांपासून अंथरुणावर खिळून होता. कोरोनाचा प्रकोप चरमसीमेवर असतानाही उपचार व ऑपरेशन सुरू ठेवणारे डॉ. जैस्वाल यांनी माफक दरात या रुग्णाला व्याधीमुक्त केलंय. सामान्य परिस्थितीमधील हा रुग्ण कुटुंबासह सिटीमध्ये आल्यावर  डॉक्टरांनी त्यांचे समुपदेशन करत ऑपरेशनसाठी त्यांची  शारीरिक व मानसिक तयारी करून घेतली. यानंतर हे आव्हान यशस्वीपणे पेलून त्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला. हा रुग्ण दुसर्‍याच दिवशी वजनासह चालल्यावर त्यांच्या व संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू जमले!