बुलडाण्याच्‍या इकबालनगरात आग; घरातील वस्‍तू खाक

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील इकबालनगर परिसरातील स्मशानभूमीजवळील झोपडपट्टीत आज, १७ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. शेख वसीम शेख अहेमद (३८) यांच्या घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात कुलर, फ्रिज, टिनपत्रे, लाकडी खांब जळून गेले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. घरामधून वेळीच गॅस सिलिंडर बाहेर काढून सुरक्षित …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील इकबालनगर परिसरातील स्मशानभूमीजवळील झोपडपट्टीत आज, १७ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. शेख वसीम शेख अहेमद (३८) यांच्या घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात कुलर, फ्रिज, टिनपत्रे, लाकडी खांब जळून गेले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.

घरामधून वेळीच गॅस सिलिंडर बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन त्या ठिकाणी पोहोचले व आग विझविली. आग कशामुळे लागली हे निश्चित समोर आले नसले तरी शेख वसीम शेख अहेमद यांना विचारले असता त्यांनी शॉटसर्किटमुळे आग लागल्‍याचे सांगितले.