बुलडाण्यात तीन घरे फोडली!; सागवन, तुलसीदासनगरात चोरट्यांचा उच्‍छाद; दुचाकीही लांबवली

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. आज, 29 जूनला सकाळी शहरातील सागवन परिसरात घरफोडी झाल्याची घटना समोर आली. त्याच भागातून अन्य एकाची मोटारसायकलही चोरीला गेली. दोन्ही गुन्हे एकाच चोरट्याने केले असावेत, अशी चर्चा आहे. सागवन भागातील समर्थनगरात योगेश भाऊराव खिल्लारे हे सारिका शिवदास शहाणे यांच्या घरात किरायाने राहतात. …
 
बुलडाण्यात तीन घरे फोडली!; सागवन, तुलसीदासनगरात चोरट्यांचा उच्‍छाद; दुचाकीही लांबवली

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. आज, 29 जूनला सकाळी शहरातील सागवन परिसरात घरफोडी झाल्याची घटना समोर आली. त्याच भागातून अन्य एकाची मोटारसायकलही चोरीला गेली. दोन्ही गुन्हे एकाच चोरट्याने केले असावेत, अशी चर्चा आहे.

सागवन भागातील समर्थनगरात योगेश भाऊराव खिल्लारे हे सारिका शिवदास शहाणे यांच्या घरात किरायाने राहतात. 16 जूनपासून घराला कुलूप लावून ते जळगाव खानदेशला गेले होते. आज सकाळी त्यांना त्यांचे शेजारी असलेले राजेंद्र पवार यांनी घरफोडी झाल्याची माहिती दिली. त्यामुळे खिल्लारे यांनी त्यांचे वडील भाऊराव खिल्लारे यांना फोन करून घटनास्थळी जायला सांगितले. भाऊराव खिल्लारे यांनी तिथे जाऊन बघितले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आतील सामान अस्ताव्यस्त होते. बेडरूममधील आलमारीचा कोंडा तुटलेला होता. कपाटातील नगदी 11 हजार रुपये, एक 8 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, लहान मुलाच्या पायातील चैनपट्ट्या व तोरड्या असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्‍याचे समोर आले. याप्रकरणी भाऊराव खिल्लारे यांच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीही चोरली…
सागवन भागात राहणारे गोपालसिंह बलदेवसिंह राजपूत यांची घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरली. एमएच 28 के 2925 क्रमाकांची दुचाकी त्यांनी रात्री घरासमोर उभी केली होती. सकाळी 4 वाजता उठून बघितले असता दुचाकी दिसली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

तुलसीदासनगरातही घरफोडी
तुलसीनगरात राहणारे हरिदास नथ्थुराव कानडजे (44) व रमेश शेळके (42) या दोघांच्या राहत्या घरी 28 जून ते 29 जूनच्या दरम्यान घरफोडी झाली. कानडजे यांनी दिलेल्या तक्ररीवरून कुलूमखेड या गावी त्यांची शेती आहे. त्यामुळे कुटुंबासह ते गावी पेरणीसाठी गेले होते. 28 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून ते 29 जून सकाळी 7:30 वाजेपर्यंत ते घरी नव्हते. आज सकाळी घरी आल्यावर त्‍यांना घर चोरट्यांनी फोडल्याचे दिसून आले. कुलून तोडून कपाटातील 10 हजार रुपये, मुलीचे कानातील रिंग वजन 4 ग्रॅम किंमत 16 हजार रुपये असा एकूण 26 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्‍याचे दिसून आले. त्‍यांच्‍या शेजारी राहणारे विलास शेळके हे सुध्दा 28 जून रोजी सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास घराला कुलून लावून चिखली येथे गावाकडे गेले होते. चोरट्यांनी त्‍यांच्‍याही घराचे कुलूप तोडून कपाटातील नगदी 22 हजार रुपये चोरून नेले. दोन्ही घरांतील मिळून 48 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. शहर पोलिसांनी घटनास्‍थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पी.एस.आय सुधाकर गवारगुरु करित आहेत.