बुलडाण्यातही महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला!;पुन्‍हा आलाच हात-पाय तोडण्याची दिली धमकी!!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुपारीच खामगाव तालुक्यात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच बुलडाणा शहरातही वाॅर्ड क्र २ भीमनगरात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना 13 मार्चच्या सायंकाळी साडेपाचला घडली.वीज कर्मचारी मंगेश किसनराव जंगले (२७, रा.इतापे ले आऊट बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनिल संजय काळे …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुपारीच खामगाव तालुक्‍यात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्‍या महावितरणच्‍या पथकावर हल्ल्याच्‍या घटनेला काही तास उलटत नाही तोच बुलडाणा शहरातही वाॅर्ड क्र २ भीमनगरात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्‍याची घटना 13 मार्चच्‍या सायंकाळी साडेपाचला घडली.
वीज कर्मचारी मंगेश किसनराव जंगले (२७, रा.इतापे ले आऊट बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनिल संजय काळे २५,रा. भीमनगर) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून त्‍याला अटक करण्यात आली आहे. वीज बिल न भरल्‍याने जंगले यांनी १२ मार्चला काळेच्‍या घराची वीज कापली होती. १८ फेब्रुवारी २०२० पासून काळेने बिल भरलेले नव्हते. त्‍याच्‍याकडे ६,१९४ रुपये बिल थकले होते. आज, १३ मार्चला सायंकाळी जंगले हे त्याच भागातील एका ग्राहकाची वीज चालू करून देण्यासाठी गेले होते. तेव्‍हा काळे त्‍यांच्‍याकडे आला व माझी वीज चालू करा, असे म्हणू लागला. बिल भरल्‍याची पावती दाखवा, असे त्‍याला म्‍हणताच त्‍याने अश्लील शिविगाळ करत चापट बुक्‍क्‍यांनी तोंडावर मारहाण केली. या वाॅर्डात पुन्हा आला तर हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली, असे जंगले यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी सुनिल काळेविरुद्ध गुन्‍हा दाखल करत त्‍याला अटक केली. तपास ए.एस.आय अप्पाराव गवई, एच.सी. प्रभाकर लोखंडे, एन.पी.सी सुरेश सावळे करत आहेत.