बुलडाण्यातील दाऊद गँगने चोरल्या महागड्या कार; जळगाव पोलीस त्‍यांना शोधत बुलडाण्यात आले..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जळगाव, बुलडाण्यासह राज्यभरातून चारचाकी वाहने चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना जळगाव खानदेशच्या स्थानिक गुन्हे शाखेने काल, २५ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. दोन्ही चोरटे बुलडाणा तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांच्या शोधासाठी जळगावच्या पोलिसांनी दोन दिवस बुलडाण्यात मुक्काम ठोकला होता. शेख झिशान शेख दाऊद (२७, रा. करडी, ता. बुलडाणा) व शेख सद्दाम शेख कदीर (२५, …
 
बुलडाण्यातील दाऊद गँगने चोरल्या महागड्या कार; जळगाव पोलीस त्‍यांना शोधत बुलडाण्यात आले..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जळगाव, बुलडाण्यासह राज्यभरातून चारचाकी वाहने चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना जळगाव खानदेशच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेने काल, २५ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. दोन्ही चोरटे बुलडाणा तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांच्या शोधासाठी जळगावच्‍या पोलिसांनी दोन दिवस बुलडाण्यात मुक्काम ठोकला होता. शेख झिशान शेख दाऊद (२७, रा. करडी, ता. बुलडाणा) व शेख सद्दाम शेख कदीर (२५, रा. घाटनांद्रा, ता. बुलडाणा) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हेगारी जगतात दोघांची ओळख दाऊद गँग असल्याचे कळते.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर व पहूर पोलीस ठाण्यात कार चोरीचे गुन्हे दाखल होते. या कार दाऊद गँगने चोरल्याची गोपनीय माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक बुलडाण्यात आले होते. बुलडाण्यातून पथकाने संशयितांची माहिती काढली. मात्र संशयित औरंगाबादला पसार झाल्याचे कळताच पथकाने औरंगाबाद गाठले. काल औरंगाबाद येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ लाख ४५ हजार रुपयांच्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.