बुलडाण्यातील महिलेचा, मेहकरच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू; नव्या 73 बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 25 जानेवारीला कोरोनामुळे आणखी दोन बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान राजे संभाजी नगर, बुलडाण येथील 82 वर्षीय महिला व मेहकर येथील 77 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. नव्या 73 बाधितांची भर पडली असून, 98 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 25 जानेवारीला कोरोनामुळे आणखी दोन बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान राजे संभाजी नगर, बुलडाण येथील 82 वर्षीय महिला व मेहकर येथील 77 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. नव्या 73 बाधितांची भर पडली असून, 98 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1797 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1724 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 73 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 72 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1648 तर रॅपिड टेस्टमधील 76 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
खामगाव शहर : 22, खामगाव तालुका : मांडका 1, भालेगाव 1, गणेशपूर 1, घाटपुरी 1, पळशी 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : सवडत 1, शेगाव तालुका : माटरगाव 1, टाकळी धारव 1, जवळा 1, सगोडा 2, शेगाव शहर : 9, बुलडाणा शहर : 8, मोताळा तालुका : पोफळी 3, मोताळा शहर : 1, मेहकर शहर : 10, देऊळगाव राजा शहर : 1, नांदुरा शहर : 1, मलकापूर शहर : 2
98 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 98 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : स्त्री रुग्णालय 1, सिद्धीविनायक हॉस्पिटल 1, अपंग विद्यालय 26, मलकापूर : 3, चिखली : 11, देऊळगाव राजा : 10, खामगाव : 5, शेगाव : 15, मेहकर : 7, नांदुरा : 1, जळगाव जामोद : 5, मोताळा : 9, सिंदखेड राजा : 4.
288 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 102647 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13209 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 3491 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 13363 कोरोनाबाधित रूग्ण असून, सध्या रुग्णालयात 288 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 166 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.