बुलडाण्यातील साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल ः प्रा. शाहिना पठाण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार देशप्रेमाचे होते. आझाद हिंद फौजेची स्थापना करून सुभाषबाबूंनी शक्तिमान इंग्रजांना देशाबाहेर घालवण्यासाठी मौलिक कामगिरी केली. परंतु नेताजींवर म्हणावे तसे साहित्य येऊ शकले नाही. राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन साहित्यिकांना नेताजींच्या विचाराकडे आकर्षित करेल, असे प्रतिपादन संमेलनाच्या कोषाध्यक्ष प्रा.शाहीनताई पठाण यांनी केले.23 जानेवारीला बुलडाणा येथील कवीवर्य …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार देशप्रेमाचे होते. आझाद हिंद फौजेची स्थापना करून सुभाषबाबूंनी शक्तिमान इंग्रजांना देशाबाहेर घालवण्यासाठी मौलिक कामगिरी केली. परंतु नेताजींवर म्हणावे तसे साहित्य येऊ शकले नाही. राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन साहित्यिकांना नेताजींच्या विचाराकडे आकर्षित करेल, असे प्रतिपादन संमेलनाच्या कोषाध्यक्ष प्रा.शाहीनताई पठाण यांनी केले.
23 जानेवारीला बुलडाणा येथील कवीवर्य भगवान ठग साहित्यनगरी गर्दे सभागृहात होणार्‍या एक दिवसीय संमेलनाबाबत संयोजन समिती सदस्यांनी आज 21 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेतून संवाद साधला. यावेळी साहित्यिक नरेंद्र लांजेवार, आयोजक तथा मुख्य संयोजक अ‍ॅड. सतिशचंद्र रोठे, सुरेश साबळे, गणेश निकम आदी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्या उपस्थितीने संमेलन बहरणार असल्याची भूमिका शाहीनाताई यांनी मांडली. संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन संयोजक तथा आयोजक समितीचे सदस्य गणेश निकम, संजय एंडोले, युवराज कापरे, आदेश कांडेलकर, श्रीकृष्ण कोकाटे, सुभाष निकाळजे उपस्थित होते.