बुलडाण्यातून चिमुकल्यासह विवाहिता बेपत्ता; जिल्ह्यातून 3 पुरुष गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील सोळंके ले आऊट येथील रहिवासी कोमल विशाल जाधव (२२) ही तरुण विवाहिता तिच्या अडीच वर्षीय वेदांश विशाल जाधव या चिमुकल्याला घेऊन ७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. घरच्यांनी तिचा सर्व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र मिळून आली नाही. तिचे पती विशाल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील सोळंके ले आऊट येथील रहिवासी कोमल विशाल जाधव (२२) ही तरुण विवाहिता तिच्या अडीच वर्षीय वेदांश विशाल जाधव या चिमुकल्याला घेऊन ७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे.

घरच्‍यांनी तिचा सर्व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र मिळून आली नाही. तिचे पती विशाल आनंदराव जाधव (२७) यांनी आज शहर पोलीस स्टेशन ती बेपत्ता झाल्‍याची तक्रार दिली आहे. तिचे वर्णन असे ः रंग गोरा, उंची १६३ सें.मी., डोळे घारे, सडपातळ बांधा, अंगात पांढरा टॉप व काळी पॅन्ट. मुलाचे वर्णन ः रंग गोरा, चेहरा गोल, डोळे मोठे, अंगात निळे टी शर्ट व जिन्स पॅन्ट. हे दोघे कुठे आढळल्यास शहर पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन तपासअधिकारी ए.एस.आय श्री. कानडजे यांनी केले आहे.

सिंदखेड राजा, शेगाव, मेहकरमधून पुरुष बेपत्ता
सिंदखेड राजा तालुक्‍यातील खापरपुडी येथील संजय देविदास राठोड (30), शेगाव तालुक्‍यातील आळसणा येथील विनोद सखाराम सुरडकर (35), मेहकरच्‍या मिलिंदनगरातील अमोल मदनलाल शर्मा (31) हे पुरुष बेपत्ता झाल्याच्या तक्रारी अनुक्रमे सिंदखेड राजा, शेगाव ग्रामीण आणि मेहकर पोलीस ठाण्यात दाखल झाल्‍या आहेत.