बुलडाण्यात ओबीसींचा एल्‍गार, घोषणाबाजीने दणाणला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्थानिक स्वराज्य संस्थांतील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी आज, २४ जूनला सकाळी ओबीसींनी बुलडाण्यात एल्गार पुकारला. घोषणाबाजीने त्रिशरण चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला. पोलिसांनी आंदोलकांना पकडून नेले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व विदर्भ ओबीसी प्राध्यापक-शिक्षक महासंघाने निदर्शने केली. नंतर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांतील धोक्‍यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्‍य सरकारने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी आज, २४ जूनला सकाळी ओबीसींनी बुलडाण्यात एल्‍गार पुकारला. घोषणाबाजीने त्रिशरण चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला. पोलिसांनी आंदोलकांना पकडून नेले.

अखिल भारतीय महात्‍मा फुले समता परिषद व विदर्भ ओबीसी प्राध्यापक-शिक्षक महासंघाने निदर्शने केली. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्‍हटले आहे, की राज्‍यात जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश नको. स्‍पर्धा परीक्षा तातडीने घ्याव्यात, राज्‍य शासनाने थांबवलेली मेगा भरती त्‍वरित सुरू करावी, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्‍वतंत्र वसतिगृह सुरू करावे, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्‍नतीमध्ये आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्या निवेदनात केल्या आहेत.

समता परिषदेच्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकाळी साडेअकराच्‍या सुमारास त्रिशरण चौकात रस्‍ता अडवून आंदोलन सुरू केले. काही वेळ आंदोलन चालल्यानंतर लगेचच पोलिसांनी त्‍यांना पकडून पोलीस व्‍हॅनमधून शहर पोलीस ठाण्यात नेले. नंतर सोडून दिले. या आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष दत्ता खरात यांनी केले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री शेळके, प्रा. सदानंद माळी, अनंता लहासे, अाशिष लहासे, श्रीकांत जाधव, नीलेश तायडे, संतोष काळे, वैभव लाड, संतोष लोखंडे, विष्णू उबाळे, रितेश चौधरी, श्लोकानंद डांगे, विजय खरात, गोपाल चांगाडे, तोलाजी जाधव, ओम मगर, दत्ता निकम, संजय चांगाडे, दीपक मगर आदींचा सहभाग होता.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ ओबीसी प्राध्यापक-शिक्षक महासंघाने निदर्शने केली. या आंदोलनात प्रा. डॉ. संतोष आंबेकर, प्राचार्य ई. जे. हेलगे, प्रा. डॉ. ए. एस. पाटील, प्रा. अनंत शिरसाट, प्रा. सुबोध चिंचोले, प्रा. डॉ. अनिल अमलकार, निळकंठ सोनटक्‍के, गजानन राठोड, अनिल मुलांडे, रामविलास कुकडे, मनोज भोपळे, सौ. रत्‍ना कैलास डिक्‍कर, सौ. सुवर्णा वडोदे, सौ. किरण लंगोटे, सौ. ज्‍योती ढोकणे, सौ. मीना सातव, सौ. प्राजु वायाळ आदींचा सहभाग होता.