बुलडाण्यात कामगार कल्याण कार्यालयासमोर उसळली कामगारांची गर्दी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कामगार कल्याण मंडळांकडून कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. त्यासाठी बुलडाणा येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या कामगार कल्याण कार्यालयासमोर अर्ज जमा करण्यासाठी आज, २१ जूनला सकाळी मजुरांची मोठी गर्दी उसळली. लांबच लांब लागलेल्या मजुरांच्या रांगा, शारीरिक दुरीच्या नियमांचा मजुरांना आणि कामगार कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांना पडलेला विसर यामुळे कोरोना संपला की काय असे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कामगार कल्याण मंडळांकडून कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो. त्यासाठी बुलडाणा येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या कामगार कल्याण कार्यालयासमोर अर्ज जमा करण्यासाठी आज, २१ जूनला सकाळी मजुरांची मोठी गर्दी उसळली. लांबच लांब लागलेल्या मजुरांच्या रांगा, शारीरिक दुरीच्या नियमांचा मजुरांना आणि कामगार कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांना पडलेला विसर यामुळे कोरोना संपला की काय असे वाटत होते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांच्या हितासाठी योजना राबविल्या जातात. त्यासाठी या सर्व कामगारांची नोंदणी करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन सुरू होते. मात्र ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचणी येत असल्याने लॉकडाऊन शिथिल झाल्याने जिल्हास्थानी येण्यासाठी वाहनांची व्यवस्था होताच मोठ्या संख्येत कामगार आज बुलडाण्यात पोहचले होते. गर्दी अधिक होत असल्याचे लक्षात येताच सर्व अर्ज अधिकाऱ्यांनी जमा करून घेत कामगारांना निघून जाण्याच्या सूचना केल्या.