बुलडाण्यात गोडावूनवर छापा; 48 हजारांचा गुटखा, तंबाखू जप्‍त!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्या गोडावूनवर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी)ने छापा मारला. यात विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करत 48 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काल, 4 एप्रिलच्या सायंकाळी 7 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. इकबाल चौकातील जामा मशीद परिसरातील महाराष्ट्र ट्रेडर्सचे मालक शेख …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्या गोडावूनवर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी)ने छापा मारला. यात विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करत 48 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काल, 4 एप्रिलच्या सायंकाळी 7 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

इकबाल चौकातील जामा मशीद परिसरातील महाराष्ट्र ट्रेडर्सचे मालक शेख मुख्तार शेख चांद हे त्यांच्या दुकानातून व गोडाऊनमध्ये  प्रतिबंध असलेल्या गुटखा व तंबाखूची विक्री करत असल्याचे एलसीबीला कळाले. एलसीबीने सापळा रचून कारवाई केली. 48 हजार 560 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखु,व सुपारीचा माल जप्त केला. याप्रकरणी आरोपी शेख मुख्तार शेख चांद याच्याविरोधात  बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, नीलेश शेळके, पोहेकाँ विलास काकड, श्रीकृष्ण चांदूरकर,सुभाष वाघमारे ,गणेश शेळके, सुनील बर्डे यांनी पार पाडली.