बुलडाण्यात जिल्हास्‍तरीय सर्वरोग निदान शिबिर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर २२ जुलैला सकाळी ९ ते ५ या वेळेत जिल्हा रुग्णालयात पार पडले. शिबिराचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. शिबिरात ७८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हास्‍तरीय सर्वरोग निदान शिबिर २२ जुलैला सकाळी ९ ते ५ या वेळेत जिल्हा रुग्‍णालयात पार पडले. शिबिराचे उद्‌घाटन आमदार संजय गायकवाड यांच्‍या हस्‍ते झाले. शिबिरात ७८० रुग्‍णांची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्‍सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्‍त जिल्हा शल्य चिकित्‍सक डॉ. भुसारी व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्‍थित होते. शिबिरात ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी या पद्धतीने रोगांची चिकित्‍सा व निदान करण्यात आले. शिबिरात विविध चाचण्या करण्यात आल्या. यावेळी उपस्‍थितांना व्यसनमुक्‍तीची शपथ देण्यात आली. मोफत औषधीही रुग्‍णांना वाटप करण्यात आली.